Post office scheme: भारत सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सशक्त बनवण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजना.ही योजना महिलांना बचत करण्यासाठी आणि या योजनेतून चांगला फायदा कमावण्यासाठी संधी देत आहे या योजनेबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.
योजनेचा उद्देश. Post office scheme
या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना वित्तीय सुरक्षा आणि आत्मनिर्भर करणे आहे. सरकारची इच्छा आहे की महिलांनी आपले पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवावे आणि त्या पैशावर चांगल्या प्रमाणात व्याज प्राप्त व्हावे ही योजना महिलांना बचत करण्याची सवय लावण्यास मदत करते.
गुंतवणुकीची सीमा. Post office scheme
या योजनेमध्ये महिलांना कमीत कमी 1000 रुपयांपासून ते जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करता येते. गुंतवणूक केल्यापासून 90 दिवसानंतर त्या आणखीन एक खाते काढू शकतात आणि पैसे हे शंभर रुपयांच्या गुणकामध्ये जमा केले जातात जसे की 1100 रुपये ,1200 रुपये ,1300 रुपये याप्रकारे जमा करू शकतात.
व्याजदर आणि कालावधी. Post office scheme
या योजनेमध्ये सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे व्याजदर आहे. सध्या सरकार 7.5% वार्षिक व्याज देत आहे हा दर अन्य बचत योजनांपेक्षा खूप जास्त आहे तुम्हाला कमीत कमी दोन वर्षांसाठी पैसा जमा करावा लागेल उदाहरणार्थ जर तुम्ही एक जून 2024 ला पैसे जमा करत असाल तर तुम्हाला एक जून 2026 ला पूर्ण रक्कम मिळेल.
काही प्रमाणात पैसे काढण्याची सुविधा. Post office scheme
या योजनेची एक खास गोष्ट ही आहे की तुम्ही तुमचे पैसे जमा केल्यास एका वर्षानंतर त्या रकमेच्या 40% भाग काढू शकता. ही सुविधा तुम्हाला गरज पडल्यानंतर मदत करेल बाकी उरलेला पैसा तुम्ही 2 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पूर्णपणे काढू शकता.
खाते कसे काढावे? Post office scheme
या योजनेमध्ये खाते काढण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला तुमच्या जवळील डाकघरांमध्ये जावे लागेल इथून एक फॉर्म घेऊन त्यामध्ये तुमचे नाव ,पत्ता ,मोबाईल नंबर, पॅन कार्ड नंबर ,फॉर्म साठी तुमच्या ओळखपत्राची झेरॉक्स जमा करावी लागेल पोस्ट ऑफिसचे कर्मचारी खाते काढण्यासाठी तुमची मदत करतील.
योजनेचे प्रमुख लाभ . Post office scheme
- जास्त व्याज : या योजनेमध्ये तुम्हाला 7.5% वार्षिक व्याज मिळेल जो बँकेच्या साधारण बचत योजनांपेक्षा जास्त आहे.
- सुविधा जनक : तुम्ही एक वर्षानंतर आपल्या रकमेचा 40% भाग काढू शकता.
- सरकारी गॅरंटी : ही योजना सरकारकडून चालवली जात आहे त्यामुळे तुमच्या पैशांची पूर्ण सुरक्षितता राहील.
काही महत्त्वपूर्ण गोष्टी. Post office scheme
- ही योजना फक्त महिलांसाठी आहे.
- तुम्हाला खाते काढण्यासाठी आपल्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागेल.
- तुम्हाला कमीत कमी 2 वर्षांसाठी पैसे जमा करावे लागतील.
- एका वर्षानंतर तुम्ही 40% रक्कम काढू शकता.
- जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजना महिलांसाठी एक चांगली संधी आहे. ही योजना फक्त तुम्हाला चांगले व्याज नाही तर तुम्हाला बचत करण्याची सवय लावते जर तुम्ही तुमच्या भविष्यासाठी पैसे जमा करू इच्छित असाल तर ही योजना तुमच्यासाठी एकदम चांगली आहे तुम्ही तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता लक्षात ठेवा की छोट्या छोट्या बचतीने मोठी रक्कम जमा होते यासाठी आजच या योजनेमध्ये गुंतवणूक करून आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी एक पाऊल पुढे या.